राज्यातील अनेक गावात पंकजा मुंडेंवर फुलांची बरसात !
बातमीदार | ९ सप्टेंबर २०२३ | राज्याच्या राजकारणात मुंडे परिवाराचे नाव मोठ्या आदराने घेतले जात आहे. याच मुंडे परिवारातील मुलगा व मुलगी सध्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात सक्रीय आहे. धनंजय मुंडे हे सध्या अजित पवारांच्या गटात असून ते कृषीमंत्री पदाची धुरा साभाळत आहे तर दुसरीकडे भाजपमध्ये असलेल्या पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी असून ते सध्या राज्यात शिव-शक्ती परिक्रमा यात्रा करत असून आज या यात्रेचा सहावा दिवस आहे.
पंकजा मुंडे यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यांचं ठिकाठिकाणी जंगी स्वागत केलं जात आहे. मोठमोठे हार घालत तसंच फुलांची उधळण करत पंकजा मुंडे यांचं स्वागत केलं जात आहे. यावेळी मुंडे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. या यात्रेदरम्यान मिळणाऱ्या प्रेमामुळे पंकजा मुंडे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. या भागाने लोकनेते मुंडे साहेबांइतकंच माझेवरही प्रेम केलं आहे. ही जनतेची सेवा आणि शक्ती वाढविण्याकडे समर्पित भावनेनं काम करण्याची शक्ती दे, हीच ईश्वराकडे प्रार्थना करते, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. आज सकाळी धाराशीव-कळंब विधानसभा निवडणूक प्रमुख दत्ता कुलकर्णी यांच्या निवासस्थानी पंकजा मुंडे यांनी भेट दिली. यावेळी पंकजा यांना ही प्रतिमा भेट देण्यात आली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम