ठाकरे गटाच्या नेत्या पौळ यांच्यावर शाईफेक करीत मारहाण !
दै. बातमीदार । १७ जून २०२३ । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील मतदार संघात कळव्यातील मनिषा नगरात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ठाकरे गटाच्या सोशल मीडिया राज्यसमन्वयक अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक करून मारहाण करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. तर घटनास्थळी आलेले पोलिस अधिकारी मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप देखील अयौध्या पौळ यांनी केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर ठाकरे गटाकडून निषेध व्यक्त केला जात आहे.
काय घडली घटना ?
ठाकरे गटाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक अयोध्या पौळ यांच्यावर ठाण्याजवळील कळवा भागात शाईफेक झाल्याचा प्रकार शुक्रवार रात्री घडला. काही महिलांनी ही शाई फेक केली असून या प्रकरणाची नोंद करण्याची प्रक्रिया कळवा पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत सुरू होती. अयोध्या पौळ यांनी ट्विटरच्या माध्यमातून विरोधकांवर टीका करत असतात. शुक्रवारी खासगी कार्यक्रम कळवा येथील जय भीम नगर परिसरात आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमासाठी अयोध्या पौळ आल्या होत्या. त्यावेळी काही महिलांनी त्यांना घेरले आणि त्यांच्या चेहऱ्यावर शाईफेक केली. या प्रकरणाची नोंद कळवा पोलिस ठाण्यात करण्यात येत असून पोलिस महिलांचा शोध घेत आहेत.
अयोध्या पौळ पाटील यांचं ट्वीट काय?
मी अन माझा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो अन माझ्या देशाचे संविधान कोणावरही हात उचलायची परवानगी देत नाही म्हणून होते असलेला हल्ला अहिंसेचा मार्ग अवलंबत सहन करत होते, माझी लढाई ही संविधानिक आहे अन मी ती लढेल. आज माझा #शिवसेना पक्ष, माझे नेते-उपनेते, आमदार अन लाखो शिवसैनिक माझ्या सोबत होता. लढण्याची ताकद तुम्ही दिली सर्वांनी. एक एक करुन व्हिडिओ समोर येत आहेत ते सोशल मीडियावर शेअर करेनच आणि घडलेला प्रकार तुम्हा सर्वांच्या पुढे मांडेन. असं म्हणत अयोध्या पौळ पाटील यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
अयोध्या पोळ यांनी आरोप केला की, त्यांच्यावर कळवा पोलिस ठाण्याच्या आवारातच मारहाण झाली. विशेष म्हणजे पोलिस देखील हा प्रकार पाहत होते, असा आरोप पौळ यांनी केला. अयोध्या पोळ प्रकरणात उपस्थित असलेल्या दोन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपैकी एक पोलिस अधिकारी मद्य प्राशन करून आले होते. धक्कादायक बाब म्हणजे मारहाण प्रकरणाचा सुत्रधार स्थानिक माजी नगरसेवक आहे. तरी देखील पोलिस कारवाई नाही. पोलिस ठाण्यात झालेली मारहाण म्हणजे संविधानावरील हल्लाच म्हणाववा लागेल, असा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम